जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन: मागण्यावर संघटना ठाम
निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मात्र आजतागायत त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आता साखर मंत्र्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करण्याचे न करण्याचे आदेश दिलेआहेत. पण तो आदेश झुगारून अनेक कारखाने सुरू झाले आहेत. यापूर्वी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ऊस दराचा तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. गुरुवारपर्यंत (ता.२०) तोडगा न निघाल्याने शुक्रवारपासून (ता.२१) बेळगाव येथील विधानसभेसमोर रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला होता. त्यानुसार निपाणी येथील शासकीय विश्रामधामात शुक्रवारी (ता.२१) सकाळी चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक होऊन पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ते आंदोलनासाठी जात असताना संकेश्वर पोलिसांनी हतरगी टोलनाक्यावर आडवून त्यांना अटक केली. त्यामुळे भर रस्त्यावर बसूनच कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यानंतर दुपारी आंदोलकांना परत जाण्याचे आवाहन केले. पण ऊस दराबाबत तोडगा निघूपर्यंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संकेश्वर पोलीस ठाण्यातच ठिय्या मारला होता. त्यानंतर शनिवारी (ता.२२) रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.तिथेही ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार म्हणाले, अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती मधील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे निपक्षपातीपणे झालेले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी भरपाई पासून दूरच आहेत. यावर्षीही परतीच्या पावसामुळे सोयाबीन ऊस व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा सर्वे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. साखर मंत्र्यांच्या बैठकीत ऊसाला साखर कारखाने आणि शासनाने मिळून प्रति टन ५ हजार ५०० देण्याची मागणी संघटनेने केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून गुरुवारपर्यंत (ता२०) सुवर्ण मध्य काढण्याचे आश्वासन साखरमंत्र्यांनी दिले होते. पण अद्याप त्याबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच गुरुवारपर्यंत (ता.२०) शासनाच्या आदेशाची वाट पाहून शुक्रवारी (ता.२१) पासून बेळगाव येथील विधानसभेसमोर धरणे आंदोलन केले जाणार जाणार होते. पण हत्तरगी पोलिसांनी अडवले. पण ऊस दराबाबत तोडगा निघेपर्यंत कार्यकर्ते पोलीस ठाण्यातून परतणार नाहीत. या पुढील काळात प्रत्येक गावात सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे राजू पोवार यांनी यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्री कित्तूर उत्सवाला येणार असून त्यावेळी त्यांची भेट घालून देण्याचे आश्वासन मिळाले आहे. तरीही रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून दर जाहीर करावा. अन्यथा माध्यमाशी बोलून यंदाच्या हंगामातील आमचे हरकत नाही. मात्र तो दर शेतकऱ्यांना मान्य नसल्यास यापुढी काळात आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही पोवार यांनी दिला आहे.
यावेळी शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी अर्ध नग्न आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
या आंदोलनात चुन्नापा पुजारी, रमेश राघवेंद्र नाईक पाटील, बाबासो पाटील, नानासाहेब पाटील, संजय नाईक, रमेश पाटील, प्रा.हालापा ढवणे,संजय पोवार, बबन जामदार, वासू पांढरोळी, रमेश मोरे, शिवानंद मुगलीहाळ, मल्लापा अंगडी, गणेश एळगेरयांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta