बेळगाव : सोमवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बिजगर्णी गावात छ. शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धारीत मूर्तीची आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, उल्लेखनीय कामगिरी करणारे राष्ट्रपुरुष हे आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत तर त्यांच्या मूर्ती भावी पिढीसाठी वंदनीय आहेत. अशा राष्ट्रपुरुषांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची संधी मिळणे हे भाग्य असून माझ्यासाठी ते सदैव प्रेरणादायी राहील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक मनोहर बेळगावकर, यल्लाप्पा बेळगावकर, युवराज कदम, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, अशोक कांबळे, अशोक बिर्जे नामदेव मोरे, संदीप अष्टेकर, अप्पू कांबळे, मंगल जाधव, शीतल तारिहाळकर, महेश पाटील, श्रीरंग भास्कल, वसंत अष्टेकर, दामू मोरे पुंडलिक जाधव आणि उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta