बेळगाव : काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे. तर भाजप हा उगवता सूर्य आहे सर्वजण उगवत्या सूर्यासमोर नतमस्तक होतात. बुडत्या जहाजावर कोणीही चढत नाही. आम. लक्ष्मी हेब्बाळकर आणि त्यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी हे दोघेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते, असे माजी आमदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत राजकीय बॉम्ब टाकला.
काँग्रेस एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांनी बेळगावचे काही भाजप नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर आज शनिवारी बेळगावात प्रतिक्रिया देताना भाजपचे माजी आमदार संजय पाटील यांनी, लक्ष्मी हेब्बाळकर आणि चन्नराज हट्टीहोळी हे दोघेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त असल्याचे सांगितले. भाजप हा उगवता सूर्य आहे, तर काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे, बुडत्या जहाजावर कोणीही चढणार नाही. त्यामुळे पक्षात कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय भाजप हायकमांड घेईल, असे सांगत त्यांनी नवा बॉम्ब फोडला आहे.
भाजप नेते योगेश गौडा यांच्या हत्येप्रकरणी 9 महिने तुरुंगात असलेले विनय कुलकर्णी यांचा काँग्रेस नेते वाढदिवस साजरा करत आहेत ही गंमतच आहे. धारवाडपासून जवळ असलेल्या कित्तूरमध्ये हा कार्यक्रम ठेवला आहे. एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी येणारे काँग्रेसचे नेते समाजाला काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा सवाल माजी आमदार संजय पाटील यांनी केला.
Belgaum Varta Belgaum Varta