Tuesday , December 9 2025
Breaking News

“गोल्डन स्क्वेअर”च्या बुद्धीबळपटूंची एससीएमए ऑल इंडिया ओपन फिडे रेटेड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विशेष बाजी

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : धारवाड येथे नुकत्याच झालेल्या एससीएमए (SCMA) ऑल इंडिया ओपन फिडे रेटेड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत बेळगावमधील गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धीबळपटूंनी घवघवीत यश मिळविले. या स्पर्धेत एकूण 257 बुद्धीबळपटूंनी भाग घेतला होता.

स्पर्धेत बेळगाव बुद्धिबळ अकादमीने पहिला क्रमांक पटकाविला. अकादमीला पहिल्या क्रमांकाचे 4000 रुपयांचे रोख बक्षीस व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ बुद्धीबळपटू दत्तात्रेयराव राव यांनी स्पर्धेत 7 गुण मिळवले आणि 1800 रेटिंग श्रेणीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे 4000 रुपये रोख रुपयांचे बक्षीस मिळविले. तर गोल्डनचे प्रशांत अणवेकर हे खुल्या गटात 6.5 गुण मिळवत 16 व्या स्थानावर सुरक्षित राहिले. त्यांना 1500 रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

11 वर्षांखालील वयोगटात अनिरुद्ध दासरी याने पाचवा क्रमांक, 13 वर्षांखालील वयोगटात माधव दासरी याने पहिला क्रमांक, तर साई मंगनाईक याने चौथा क्रमांक, 15 वर्षांखालील वयोगटात साईप्रसाद खोकाटे याने दुसरा क्रमांक मिळाला. गीतेश सागेकर याने 9 वर्षाखालील वयोगटात, 10 वा क्रमांक मिळविला.

वैष्णवी व्ही हिने 13 वर्षांखालील वयोगटात पाचवा, अक्षत शेटवालने 15 वर्षांखालील वयोगटात नववा, जान्हवी व्ही हिने 9 वर्षांखालील वयोगटात नववा तर सारा कागवाडने दहावा क्रमांक मिळविला. परीक्षित एस. एम. ने 7 वर्षाखालील वयोगटात दहावा क्रमांक पटकाविला. विजेत्यांना आकर्षक चषक देऊन सन्मानीत करण्यात आले.

रॅपिड फिडे रेटिंगमध्ये शिवनागराज ऐहोळेला सुमारे 1100, गीतेश सागेकरला 1050, अक्षत शेटवालला 1048, अवनीश मुतगेकर यांना 1020, ओम जाधवला 1020 फिडे रॅपिड रेटिंग (मानांकन) मिळाले.
आदिती चिखलवाले, रक्षित कल्याणशेट्टी, विघ्नेश मुतगेकर, आर्यन कुलकर्णी या बुद्धीबळपटूंनी उल्लेखनीय खेळाचे दर्शन घडविले.

गोल्डन स्क्वेअरचे यशस्वी बुद्धीबळपटूं गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीचे प्रशिक्षक प्रशांत अणवेकर यांच्याकडे बुद्धीबळ खेळाचा सराव करतात. यांना बेळगाव बुद्धीबळ संघटनेचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक दत्तात्रेय राव यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *