मुंबई : मुळचे बेळगाव भांदूर गल्ली येथील रहिवासी आणि सध्या पुणे येथे नामवंत आयटी कंपनीत काम करीत असलेले युवा कार्यकर्ते अमित देसाई यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभियंता सेल निमंत्रकपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपतीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शना नुसार अमित देसाई यांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भाचे पत्र पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी अमित देसाई यांना दिले आहे.
अलीकडेच शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील मंथन बैठकीत, अमित देसाई यांनी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या अत्याधुनिक घडामोडींबाबत आपले विचार मांडले होते. त्यानंतर आता त्यांची पक्षाच्या अभियंता सेल निमंत्रक पदी निवड झाली आहे.
भावी काळात महाराष्ट्रातील जिल्हा जिल्ह्यात जाऊन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणे. योग्य सल्ला सूचना देणे. अभियंत्यांची नवी फळी निर्माण करणे, अशी महत्त्वाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अमित देसाई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अमित देसाईंच्या नियुक्तीचे महाराष्ट्रसह बेळगाव सीमाभागातही कौतुक व्यक्त केले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta