बेळगाव : इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क भरून त्याला आर्थिक मदत देण्यात आली आहे. सदर मदत एंजल फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली असून गोरगरीब आणि गरजूंना मदत करण्याचा ध्यास एंजल फाउंडेशनने घेतला आहे.
याआधीही एंजल फाउंडेशनने गोरगरीब आणि गरजूंना आर्थिक मदत करून त्यांना सहकार्य केले आहे तसेच येणाऱ्या काळातही त्यांनी मदत करण्याचा वसा आपल्या हाती घेतला आहे.
एंजल फाउंडेशनच्या अध्यक्ष मीना बेनके यांच्याकडून इयत्ता दुसरी शिकणाऱ्या विद्यार्थ्याची फी भरण्यात आली. सदर विद्यार्थी हा बी. के. मॉडेल शाळेचा असून त्याला शैक्षणिक मदत केल्याबद्दल तिच्या शिक्षकांनी आणि कुटुंबियांनी एंजल फाउंडेशनचे आभार मानले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta