Friday , March 6 2026
Breaking News

खाणीतील पाण्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : दोन शाळकरी विद्यार्थ्यांपैकी एकाचा खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जनता कॉलनी सुळगा (उ.) ता. बेळगाव येथे आज सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच काकतीचे पोलीस पोलीस निरीक्षक सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवून विद्यार्थ्यांचा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणाची काकती पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कर्तव्य कठोर… पण मन माणुसकीने ओथंबलेले!

Spread the love  डी डी पी यू श्री एम एम कांबळे यांचे भावस्पर्शी छायाचित्र! बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *