Wednesday , March 4 2026
Breaking News

संत मीरा शाळेच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या स्वारा आंजणकर, रेनिवार मालशेय स्वरूप हलगेकर या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी तर अब्दुल्ला मुल्ला यांची राज्य अथेलिटीक स्पर्धांसाठी निवड झाली आहे.
बळ्ळारी येथे नुकत्याच झालेल्या विद्याभारती प्रांतीय व क्षेत्रीय स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या गटात स्वरूप हलगेकरने 110 मी अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले आता त्याची कुरुक्षेत्र येथे 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या विद्याभारती राष्ट्रीय स्पर्धेसाठी भाग घेणार आहे. तसेच शिमोगा येथे नुकत्याच झालेल्या शिक्षण खात्याच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेच्या स्वारा आंजणकर रेनिवार मालशेय यांची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे तर नेहरूनगर येथील जिल्हा क्रिडागणांवर नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय अथलेटिक स्पर्धेत प्राथमिक गटात 80 मी. अडथळा शर्यतीत अब्दुल्ला मुल्लाने प्रथम क्रमांकसह सुवर्णपदक पटकाविले. यांचीही राज्य स्पर्धसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील निरंज सावंत, मयुरी पिंगट, गौतम तेजम, यांचे मार्गदर्शन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांचे प्रोत्साहान लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *