बेळगाव : दि. १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या शारदोत्सव महिला सोसायटी आयोजित आनंदमेळावा फूड फेस्टिव्हलचा मुहूर्तमेढ कार्यक्रम थाटात संपन्न झाला.
यावेळी कर्नाटक राज्य भाजपा ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव, शारदोत्सव महिला सोसायटी अध्यक्षा श्रीमती अरुणा नाईक, उपाध्यक्षा डॉ. अंजली जोशी, श्रीमती शोभा डोंगरे, कार्यवाह श्रीमती सुखद देशपांडे, श्रीमती नमिता कुरुंदवाड, कोशाध्यक्ष श्रीमती अपर्णा सामंत, श्रीमती आरती सांबरेकर, कार्याध्यक्ष भीमा नाडकर्णी, अध्यक्ष अरुणा नाईक यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आनंदमेळावा फूड फेस्टिव्हलचा सर्व बेळगाववासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी उपस्थित सदस्यांनी केले. आनंदमेळावा भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta