बेळगाव : ट्रकची धडक बसून रस्त्यावरून जाणारा पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना छ. शिवाजी उद्यानासमोरील एसपीएम रोडवर सकाळी 7 च्या दरम्यान घडली. श्रीराम स्वामी (रा. शिवाजीनगर) असे जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. तसेच आपल्या संघटनेच्या रुग्णवाहिकेतून पायाला गंभीर दुखापत झालेल्या पादचाऱ्याला तातडीने विजया हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल केले.
गेल्या काही महिन्यांमध्ये शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे बरेच अपघात घडले असून काहींचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र अद्यापही शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली नाही अथवा घालण्यात आलेल्या बंदीची अंमलबजावणी होत नाही. परिणामी आज सकाळच्या अपघाताची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन शहरातील अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta