बैलहोंगल : समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बैलहोंगल शहरात घडली आहे.
परशुराम कोनेरी (रा.कोडीवाड, ता. बैलहोंगल) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. इतर विद्यार्थी कॉलेजला निघून गेल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कॉलेजमधून परतल्यानंतर विद्यार्थ्याने दरवाजा अवघडल्याने इतर विद्यार्थ्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची बैलहोंगल पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta