येळळूर : ‘रिंगरोड’विरोधात सोमवार दिनांक 28 रोजी नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘चाबूक मोर्चा’ काढण्याचा निर्णय तालुका म. ए. समितीने घेतला आहे. सदर मोर्चाला पाठिंबा देऊन जनजागृती करण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता श्रीचांगळेश्वरी देवालयात ‘जनजागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे.
या जनजागृती सभेला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष भाई राजाभाऊ पाटील, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितिचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, कॉ. आनंद मेणसे, सामाजिक कार्यकर्ते श्री. शिवाजी कागणीकर, तालुका महाराष्ट्र युवा समितीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील, उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, माजी महापौर शिवाजीराव सुंठकर, श्री. मनोज पावशे, ऍड. श्याम पाटील, मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक आर. आय. पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस विलास घाडी, युवानेते श्री. आर. एम. चौगुले इत्यादी तालुक्यातील नेते मंडळी मार्गदर्शन करणार आहेत, तरी येळ्ळूर विभागातील शेतकरी बांधव, शेतकरी सोसायटीचे संचालक, माजी जिल्हा पंचायत सदस्य, तालुका पंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी आणि चिटणीस प्रकाश अष्टेकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta