Wednesday , December 10 2025
Breaking News

तारांगण व एंजल फाउंडेशनतर्फे महिलांसाठी बाईक रॅलीचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : तारांगण व एंजल फाउंडेशनच्या वतीने बेळगावच्या महिलांसाठी दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता बाईक रॅलीचे आयोजन केले आहे.
या रॅलीमध्ये वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. सामाजिक कार्यात आघाडीवर असणाऱ्या एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या पुढाकाराने महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे.

नियम
१) या स्पर्धेत १८ वर्षे पूर्ण असलेली कोणतीही दुचाकी चालक महिला सहभागी होवू शकते.
२) स्पर्धकाने पारंपारिक वेशभूषा परिधान करणेची आहे.
३) बुलेट दुचाकीसाठी वेगळी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
४) स्पर्धेत मोफत प्रवेश आहे.
५) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

बाईक रॅलीचा मार्ग धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खडे बझार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, चन्नमा सर्कल, सरदार ग्राउंड हा असेल. स्पर्धेचा बक्षीस समारंभ महिला विद्यालय येथे होणार आहे. बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके उपस्थित असून त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस दिली जाणार आहेत.
प्रथम क्रमांक रु.५०००/-, द्वितीय क्रमांक रु.३०००/-, तृतीय क्रमांक रु.२०००/-, उत्तेजनार्थ रु.१०००/-,
बुलेट दुचाकीसाठी विशेष बक्षीस दिले जाणार आहे. सुधा माणगावकर ८९५१२२५२७८ यांच्याकडे स्पर्धकांनी नाव नोंदणी करणेचे आहे. नाव नोंदणीची अंतिम मुदत दिनांक १ डिसेंबर २०२२ ही आहे. जास्तीत जास्त महिलांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आयोजकांनी कळवले आहे.

About Belgaum Varta

Check Also

चर्चच्या बांधकामावरून निर्माण झालेला वादासंदर्भात बेळगाव बिशप यांनी घेतली मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची भेट

Spread the love  बेळगाव : गदग जिल्ह्यातील गजेन्द्रगड येथील होली फॅमिली स्कूल परिसरात पाद्री निवासस्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *