बेळगाव : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना 7 फेब्रुवारी रोजी बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बेळगावमध्ये 30 मार्च 2018 रोजी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना आज दि. 1 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, संजय राऊत आज व्यक्तिगत कारणामुळे हजर झाले नाहीत. संजय राऊत यांनी आपल्या वकिलांमार्फत बेळगाव न्यायालयाला सांगितले.
याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान राऊत यांच्या वकिलांनी संजय राऊत यांना हजर राहण्यासाठी पुढील तारीख देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, न्यायालयाने 7 फेब्रुवारी ही तारीख दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta