बेळगाव : कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग कायमस्वरूपी फिरत्या खंडपीठासाठी जिल्हा ग्राहक आयोगाची इमारत निवडण्यासाठी आणि बेळगावमध्ये अतिरिक्त ग्राहक आयोग स्थापन करण्यासाठी बेळगावच्या वकिलांनी कामकाजावर बहिष्कार टाकत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करून सरकारचा निषेध केला.
शुक्रवारी बेळगाव बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी वकिलांनी कामकाजावर बहिष्कार टाकत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करून सरकारचा निषेध केला. कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे कायमस्वरूपी फिरते खंडपीठ बेळगाव येथे स्थापन करण्याची शिफारस त्यांनी यापूर्वीच केली होती व जिल्हा न्यायालयाजवळील जिल्हा ग्राहक आयोगाची इमारत निवडण्यात यावी, असा आग्रह धरला होता. ज्येष्ठ नागरिकांची बहुतांश प्रकरणे ग्राहक न्यायालयात दाखल केली जातात आणि ती अन्यत्र स्थापन केल्यास ज्येष्ठ नागरिक व वकिलांना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे या पीठाची स्थापना बेळगावातच झाली पाहिजे. याचिकेत त्यांनी स्वतंत्र न्यायालय, कक्ष, कर्मचारी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासंबंधी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी यांनी आपल्या मागणीबद्दल आपली मराठीला माहिती दिली.यावेळी ऍडआर.पी.पाटील, एन.आर. लातूर तसेच अन्य वकील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta