Thursday , June 4 2026
Breaking News

मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नका; मुख्यमंत्री बोम्मई

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात बेळगावला पाठवू नये असा संदेश महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवला असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. रामदुर्ग तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री बोम्मई यांनी सालहळ्ळी येथे आज शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. सध्या दोन्ही राज्यातील परिस्थिती लक्षात घेता चंद्रकांत पाटील यांनी बेळगावला येऊ नये अशी विनंती कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी एका संदेशाद्वारे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाला केली आहे. यापूर्वी अनेकदा अशा पद्धतीचे प्रयत्न झाले असले तरी कर्नाटक सरकारने त्याविरुद्ध जे क्रम घेतले तेच क्रम यावेळीही घेतले जातील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण अभियान

Spread the love  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनच्या वतीने नंदीहळ्ळी जवळील नागेनहट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *