Thursday , December 11 2025
Breaking News

आर. एम. चौगुले यांच्यावतीने किल्ल्याच्या प्रतिकृती साकारलेल्या बालचमुंचा गौरव

Spread the love

 

बेळगाव : सांबरा गावात दिवाळीनिमित्त किल्ल्याच्या प्रतिकृती साकारण्यात आलेल्या बालचमुंचा गौरव करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोमवारी रात्री आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरमा चिंगळी होते.
अभियंते आणि म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्यावतीने किल्ल्याच्या प्रतिकृती साकारलेल्या सर्व बालचमुंना प्रमाणपत्र आणि मंडळाना चषक देवून गौरवण्यात आले. महादेव नगर येथील विश्वशक्ती युवक मंडळ, बसवेश्वर युवक मंडळ, गणेश नगर येथील शिवामुद्रा कट्टा ग्रुप, नवज्योती युवक मंडळ, महात्मा फुले गल्ली युवक मंडळ, मारुती गल्ली, छ. संभाजी चौक युवक मंडळ, कलमेश्वर युवक मंडळ, मेन रोड युवक मंडळ, मारुती गल्ली युवक मंडळ, लक्ष्मी गल्ली युवक मंडळाचा गौरव करण्यात आला.

यावेळी कल्लाप्पा सोनजी, महादेव अष्टेकर, मोहन हरजी, निवृत्त शिक्षक मारुती चिंगळी, उमेश चौगले, अप्पानी यड्डी, गोपी पालकर, भुजंग धर्मोजी, भावकांना सोनजी, मोहन जोई, गजानन सावगावकर, लक्ष्मण जोई, परशराम गिरमल, पप्पू सावगावकर, विनायक सोनजी, शंकर गिरमल, उमेश कोकितकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मॉडेल मराठी शाळा येळ्ळूरमध्ये नूतन एसडीएमसी अध्यक्षपदी दिव्या कुंडेकर

Spread the love  स्मार्ट टीव्ही व तिजोरीचे उद्घाटन बेळगाव : येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *