Tuesday , March 3 2026
Breaking News

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी प्रयत्नशील : सुनील जाधव

Spread the love

बेळगाव : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी जमा केलेली कागदपत्रे काकती, उचगाव, बेळगाव येथील कृषी कार्यालयात जमा करण्यात आली आहेत, तिथून पुढे तलाठी व तहशीलदार मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होणार आहे.

बळळारी नाल्यापासून शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचा अर्ज दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह (7/12, पिकाची नोंद असलेल्या सात बारा पुरावा बॅंक खाते, आधार कार्ड इ.) बेळगाव, उचगाव, काकती, विभागावर कृषी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. शेतकरी परिपूर्ण माहितीसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करु न शकल्यास चवाट गल्ली बेळगाव येथील सुनील जाधव सेवा केंद्रात 25 जुलै 2021 पर्यंत दुपारी 1 ते 3 या वेळेत संपर्क साधावा,9964370261, किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे शेतकरी स्वतः अर्ज सादर करु शकतो.

बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत आणि तालुकाध्यक्ष सुनील जाधव, सुनील खनुकर, यांनी आतापर्यंत साडे चारशेहून अधिक शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईचा अर्ज भरला आहे.

About Belgaum Varta

Check Also

“सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू” : हेमंत ढोमे यांची बेळगावकरांना ग्वाही

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *