बेळगाव : बेळगाव मराठा समाज सुधारणा मंडळ आयोजित केलेल्या मासिक वधू वर पालक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मेलगे गल्ली शहापूर येथे मंडळाच्या वास्तूत झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील होते तर व्यासपीठावर वधू वर मंडळ प्रमुख ईश्वर लगाडे, सरचिटणीस जी. जी. कानडीकर, खजिनदार के. एल. मजूकर, मोहन सप्रे व सुरेन्द्र जाधव होते.
यावेळी बोलताना शिवराज पाटील म्हणाले, बेळगाव शहर व परिसरात अनेक वधू वर मंडळ कार्यरत आहेत पण मराठा समाज सुधारणा मंडळाचा कारभार पारदर्शी व स्वच्छ असल्याने दिवसेंदिवस मंडळाची लोकप्रियता वाढत आहे. यावेळी 150 आसपास वधू- वर व पालकांची उपस्थिती होती. यावेळी के.एस. सामजी यांनी मंडळाला 11000 रूपयांची देणगी जाहिर केली.
स्वागत व प्रास्ताविक के. एल. मजूकर यांनी तर आभार मोहन सप्रे यांनी मांडले.
Belgaum Varta Belgaum Varta