निपाणी : बेळगावात सोमवारपासून सुरु होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी चेक पोस्टवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी येणार असलेल्या खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. महाराष्ट्रातून महामेळाव्याला येण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांना कोगनोळी चेक पोस्ट वरून परत पाठवण्यात येणार आहे.