बेळगाव : सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन विकास साधावा, सर्व प्रथम आपण माणूस आहोत. समाजाचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी जाती व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणून सर्व घटकांनी एकत्रित येऊन विकास साधावा, असे आव्हान श्री श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजींनी केले.
बेळगावमधील अनेक समाज प्रमुखांची भेट घेतली त्यामध्ये श्री विश्वकर्मा मनु-मय संस्था, दैवज्ञ ब्राम्हण समाज, इ. त्यांच्या सोबत भाजपा ओबीसी मोर्चाचे सचिव व सकल मराठा सामाजाचे संयोजक श्री. किरण जाधव यांनी उपस्थिती दर्शवली होती. प्रारंभी संस्था प्रमुखांनी उपस्थितांचे स्वागत केले व समाज्याच्या वतीने स्वामीजींची पाद्य पुजा करून पुष्प हार, श्रीफळ व शाल अर्पण करून वंदन करण्यात आले. विश्वकर्मा मनु-मय संसंस्थेतील मुख्य कार्यकारी मंडळी उपस्थित होते. यामध्ये श्री. भारत शिरोळकर, श्री. प्रभाकर सुतार, श्री. किशोर कणबरकर, श्री. सोहन सुतार, श्री. किसन ठोकाणेकर, श्री. विजय सुतार, प्रदीप उपस्थित होते. त्याच बरोबर दैवज्ञ ब्राम्हण समाज्यातर्फे प्रदीप अरकसाली, अमित हेरेकर, सागर हळदणकर, प्रकाश कलघटकर, सचिन कारेकर, किरण कारेकर, गुरुनाथ शिरोडकर, सुरेश चिंचणेकर, विजय सांबरेकर उपस्थित होते.
संत गाडगे महाराज सामाज्यातर्फे विठ्ठल पालेकर, मयुर चव्हाण, विष्णु सारोळकर, विनायक पवार, विक्रम किल्लेकर, ज्योतिबा उपरडेकर, सतीश लकले, मांगांना पालेकर,परशराम अष्टेकर, लखन पारिट, राजू यादव यावेळी उपस्थित होते.
या वेळी सर्वांनी स्वामीजींची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले यावेळी स्वामीजी बोलत होते. कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या भूमिकेला पाठींबा देऊन मराठा समाजाने सरकारकडे केलेल्या मागण्यांचे समर्थन करावे.