ढाका : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी भारताने तीन गडी राखून विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे सामना अगदी अखेरपर्यंत कोणाच्या पारड्यात झुकेल हे कळत नव्हते. सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 227 धावाच केल्या, ज्याच्या बदल्यात भारतानं 314 धावा आपल्या पहिल्या डावात स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव 231 धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले, जे पार करता करता भारताचे 7 गडी बाद झाले पण अखेर अय्यर आणि अश्विन जोडीने संयमी खेळ दाखवत 3 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारतानं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशला क्लिन स्वीप दिला आहे.