खानापूर तालुका म. ए. समितीचे आवाहन
खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या “चलो कोल्हापूर” धरणे आंदोलनासाठी खानापूर तालुका म. ए. समितीच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींसह हजारो कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथे धरणे आंदोलनासाठी सामील होण्यापूर्वी सर्व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी 7.30 वाजता शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या दुचाकी, चारचाकी किंवा बसने कोल्हापूरसाठी निघायचे व सर्व कार्यकर्त्यांनी कोगनोळी नाक्यांवरील आरटीओ सर्कल जवळ एकत्र जमायचे आहे. त्या ठिकाणी बेळगाव, खानापूर तसेच निपाणी समितीचे कार्यकर्ते एकत्र जमणार आहेत. त्यानंतर कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेत्यांकडून सीमावासीयांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर कलेक्टर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. धरणे आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वतःचे हेल्मेट स्वतःच्या वाहनांची आवश्यक कागदपत्रे, स्वतःची शिदोरी व मास्क सोबत आणावयाचे आहे, असे आवाहन खानापूर समितीकडून करण्यात येत आहे.