उचगाव : उचगाव येथील जी. जी. बॉईज यांच्या वतीने ५५ किलो गटात रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उचगाव स्मशानभुमीच्या पटांगणात भव्य कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
यासाठी प्रथम बक्षीस रुपये २२,२२२ म. ए समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्याकडून, व्दितीय बक्षीस रुपये ११,१११ आंबेवाडी ग्राम पंचायत अध्यक्ष चेतन पाटील आणि राकेश बांदिवडेकर यांच्याकडून तर तिसरे बक्षीस रुपये ३,३३३ सुमित लाळगे यांच्याकडून तर चषक तौफिक ताशिलदार यांच्या कडून आणि जर्सी विनायक चौगुले यांच्याकडून देण्यात आले आहेत. तरी यांचा सर्व स्पर्धकांनी लाभ घ्यावा, असे संयोजकांनी कळवले आहे.