बेळगाव : सीमातपस्वी सीमावासियांचे आधारवड भाई डॉ. एन. डी. पाटील यांचा पहिला स्मृतिदिन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात करण्यात आला. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी भाई एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, मनोहर संताजी, रामचंद्रम मोदगेकर, आर. आय. पाटील, सरस्वती पाटील, प्रेमा मोरे, कमळ मन्नोळकर, माधुरी हेगडे, निरा काकतकर, नानु पाटील, कृष्णा हुंद्रे, सुरेश राजूरकर, पुंडलिक पावशे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.