येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांची बैठक रविवार (ता.17) रोजी सकाळी 11-00 वाजता शाळेच्या सभागृहात, शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रारंभी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व शिक्षक संजय मजूकर यांनी बैठक बोलावण्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा. सी. एम. गोरल यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उपस्थित अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. एकंदरीत सर्व माजी विद्यार्थ्यांच्या विचारातून असे ठरविण्यात आले की, श्री शिवाजी विद्यालयाच्या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्काराचे नियोजन करणे. त्याचबरोबर शिवाजी विद्यालयामध्ये आजपर्यंत शिक्षकासोबत जे-जे कर्मचारी होऊन गेले, त्या सर्वांचाही सत्कार करणे, त्याचबरोबर श्री शिवाजी विद्यालयाच्या विकास घडवून आणणे, कंपाउंडचे बांधकाम पूर्ण करणे, विद्यालयाला रंगरंगोटी करणे, विद्यालयामधील विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी -सुविधा पुरविणे, असे ठरविण्यात आले. यावेळी अनेक उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी स्वखुशीने आपल्या विद्यालयासाठी देणग्या जाहीर केल्या. त्याचबरोबर सेवानिवृत शिक्षकांच्या सत्काराचे नियोजन डिसेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यात घेण्याचे ठरविण्यात आले. बैठकीमध्ये माजी विद्यार्थ्यांचे मंडळ स्थापन करणे. विविध कमिट्या स्थापन करून सर्व विद्यार्थ्यावर जबाबदारी सोपवून, एकंदर नियोजनबद्धरित्या कार्यक्रम पार पडणे, असेही ठरविण्यात आले. प्रत्येक माजी विद्यार्थ्यांने आपापल्या वर्ग मित्रांसमवेत बोलून विद्यालयाच्या विकासासाठी स्वखुशीने आर्थिक हातभार लावावा असेही ठरविण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक रविवारी बैठकीचे आयोजन करणे. बैठकीला प्रकाश नंदीहळ्ळी, परशराम मोटराचे, डी. जी. पाटील, दूधाप्पा बागेवाडी, डॉ. तानाजी पावले, माणिक उघाडे, हणमंत पाटील, सुनील अतिवाडकर, सतीश पाटील, अनिल पाटील, परशुराम कुट्रे, प्रशांत सुतार, राजू उघाडे, मल्लाप्पा कुंडेकर, हणमंत कुगजी, विष्णू मासेकर, संजय गोरल, रामलिंग कानशिडे, संजय मासेकर, रणजीत गोरल, राजाराम हुंदरे, संजय मजूकर, अशोक हट्टीकर, अमोल जाधव, विवेक सूळगेकर आदी यावेळी उपस्थित होते. शेवटी सतीश पाटील यांनी आभार मानले.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …