बेळगाव : अनसूरकर गल्ली येथील दि. बेळगाव मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने पायोनियर अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांचा सत्कार करण्यात आला. मंगळवारी सोसायटीच्या सभागृहात झालेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन नारायण चौगुले हे होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा बँकेचे संचालक आणि माजी चेअरमन बाळासाहेब काकतकर तसेच समर्थ अर्बन सोसायटीचे चेअरमन अजय सुनाळकर हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सोसायटीच्या उपाध्यक्षा सौ. कुमुद भाटिया याही उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोसायटीचे शाखा चेअरमन नारायण किटवाडकर यांनी प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. पायोनियर अर्बन बँकेत 106 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठल्याबद्दल दिल्ली येथे केंद्रीय सहकार खात्याने त्यांचा विशेष गौरव केला. पायोनियर अर्बन बँकेने केलेल्या प्रगतीमुळे बेळगाव सहकार क्षेत्रातच्या शिरपेचातही मनाचा तुरा रोवला गेला आहे. या पार्श्वभूमीवर सोसायटीच्या वतीने पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांचा सत्कार करण्यात आला. याचप्रमाणे बाळासाहेब काकतकर आणि अजय सुनाळकर यांचाही सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना प्रदीप अष्टेकर म्हणाले, सहकारी क्षेत्रावर आज आरबीआयने अनेक जाचक नियम लादले आहेत. त्यामुळे सहकारी संस्था किंवा बँका चालवणे ही तारेवरची कसरत ठरत आहे. बँकेचे संचालक आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच आज सहकारी पतसंस्था यश मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब काकतकर आणि अजय सुनाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. चेअरमन नारायण चौगुले यांनी सोसायटीच्या आर्थिक कारभाराचा आढावा घेऊन 2023 मध्ये सोसायटीच्या साजरा होणाऱ्या रौप्य महोत्सवाबद्दल माहिती दिली.
यावेळी सोसायटीचे ज्येष्ठ संचालक अशोक येळ्ळूरकर, महेश रायकर, शिवाजी चव्हाण, नितीन पवार, जनरल मॅनेजर लक्ष्मीकांत मकवान, शाखा मॅनेजर संतोष फडतरे, सल्लागार संचालक संजय ओझा, कायदेशीर संचालक ऍड. सुरेश तरळे, वकील प्रभाकर शेट्टी, वकील उमेश एरडाल, गोल्ड व्हॅल्युएटर एन. एम. रायकर, ऑडिटर नितीन हिरेमठ तसेच सोसायटीचे कर्मचारी आणि पिग्मी एजंट उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta