Wednesday , March 4 2026
Breaking News

नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्या वडगाव शाखेचे सोमवारी उद्घाटन

Spread the love

 

 

येळ्ळूर : येथील नेताजी युवा संघटना संचलित, नेताजी मल्टीपर्पजको-ऑप सोसायटी लिमिटेड येळ्ळूर या संस्थेच्या वडगाव येथील स्थलांतरित नूतन शाखेचे उद्घाटन सोमवार (दि. 23) जानेवारी 2023 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित साधून सायंकाळी सहा वाजता कारभार गल्ली, वडगांव, (पिंपळ कट्यासमोर) होणार आहे. गेल्या पाच वर्षापासून नेताजी मल्टीपर्पज सोसायटीची वडगाव शाखा या ठिकाणी कार्यरत आहे, नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्या संचालक मंडळाने कारभार गल्ली, वडगाव या ठिकाणी स्वतःची इमारत खरेदी केली असून, त्या इमारतीमध्ये या वडगाव शाखेचे स्थलांतर व उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम सोमवारी सायंकाळी 6-00 वाजता होणार आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमिताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वडगाव व परिसरात नेताजी मल्टीपर्पज सोसायटीने आपला नावलौकिक कायम ठेवला असून अल्पावधीतच या परिसरात ही संस्था नावारूपाला आली आहे. उद्घाटन सोहळ्यानिमित्त सायंकाळी सोमवार (ता. 23) रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत होणार आहे.

उद्घाटना निमित्त खास ऑफर
वडगाव शाखा उद्घाटनानिमित्त संस्थेने रुपये 30,000 च्या पटीत सात वर्षे तीन महिन्याकरिता रक्कम गुंतवल्यास तुम्हाला दाम दुप्पट परत मिळणार असून त्याचबरोबर एक आकर्षक भेटवस्तू सुद्धा मिळणार आहे. ही योजना फक्त मर्यादित कालावधी करिता असणार आहे. तेव्हा उद्घाटन कार्यक्रमास संस्थेचे सभासद, भागधारक व मित्रमंडळी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे अवाहन संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील, व्हा. चेअरमन आर. एम. मुरकुटे व संचालक मंडळाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *