
बेळगाव : विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाला प्राधान्य दिले पाहिजे. मैदानी खेळाची जागा व्हिडीओ गेमने घेतली तर मैदानाची जागा टोलेजंग इमारतींनी. त्यामुळे सध्याची पिढी मैदानी खेळापासून वंचित आहे, असे मत डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले. त्या पंडित नेहरू हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकताच पार पडल्या त्या कार्यक्रमात बोलत होत्या.
कार्यक्रमाला विश्वभरात सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजय नंदिहळी, सुरेखा धामणेकर, भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, सौ. सोनाली चंदगडकर, सुदेश मेलगे, हनुमान स्पोर्ट्सचे मालक अनंत सोमनाचे, सोमनाथ काकडे, विठ्ठल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. हिरेमठ तसेच शाळेतील शिक्षक वर्गाने केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण व फोटोपूजन करण्यात आले. तसेच शाळेतील राज्यस्तरीय व राष्ट्रीय ज्यूडो व कुस्तीपटूचा सत्कार करण्यात आला. भीमु काटे (राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड), कार्तिक पावससकर (राज्यस्तरीय ज्यूडो स्पर्धेत द्वितीय क्रमांक), संजीव पुजारी (राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक), श्रावणी पाटील (राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांक), स्वयंम पावले,(एन.सी.सी.RDC साठी निवड), राधिका बैलूरकर (उत्कृष्ट खेळाडू) या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. या खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक निरंजन कार्लेकर तसेच विनायक कंग्राळकर व शाळेचे मुख्याध्यापक तसेच शाळेतील सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा पाटील यांनी केले तर विकास पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर विजया पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta