Saturday , March 7 2026
Breaking News

रिंगरोड व रेल्वे लाईन विरोधात झाडशहापूर येथे उद्या रास्तारोको आंदोलन!

Spread the love

 

बेळगाव : रिंगरोड व रेल्वे लाईन विरोधात झाडशहापूर येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 23 रोजी सकाळी साडेदहा वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. सरकारने बेळगाव तालुक्यात 32 गावांमध्ये जाणारा रिंगरोड व बेळगाव ते धारवाड हा नवीन रेल्वे मार्ग हा प्रस्ताव केला आहे. या दोन्ही रस्त्यांना तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. हा रिंगरोड व नवीन रेल्वे मार्ग रद्द व्हावा म्हणून शेतकऱ्यांनी कायदेशीर लढा सुरू केला आहे. चाबूक मोर्चा व जनआक्रोश आंदोलन केली जात आहेत. शेतकऱ्यांची मागणी एवढीच आहे की रिंगरोड व बेळगाव ते धारवाड रेल्वे लाईन हे प्रस्ताव रद्द करावेत. यासाठी आता शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन हाती घेतले आहे. यासाठी आता बेळगाव- खानापूर या महामार्गावर झाडशहापूर गावांजवळ रास्ता रोको आंदोलन छेडण्याने ठरले आहे. यासाठी आता शेतकरी पेटून उठला आहे व या रास्ता रोको आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व हा रास्तारोको यशस्वी करावा, असे आवाहन बेळगाव तालुक्यातील शेतकरी व महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *