Saturday , March 7 2026
Breaking News

ट्रायथलॉन व डुथलॉन स्पर्धा 12 फेब्रुवारी रोजी

Spread the love

 

बेळगाव : हिंदवाडी येथील सुपरबीइंग स्पोर्टिंग अकॅडमी बेळगाव पुरस्कृत थॉटफ्लो एज्युकेशन ट्रस्ट बेळगाव, पॅडलर्स क्लब बेळगाव अक्वाटीक क्लब अँड आजरेकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सुपरबीइंग २०२३ ट्रायथलॉन आणि डुथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती स्पर्धा प्रमुख डॉक्टर किरण खोत आणि सई जाधव यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. बीइंग २०२३ डुथलॉन या स्पर्धेतील ऑलम्पिक डिस्टन्स या गटात ५ किलोमीटर धावणे ४० किलोमीटर सायकलिंग व १० किलोमीटर धावणे तर स्प्रिंट डिस्टन्स या गटात ५ किलोमीटर धावणे, २० किलोमीटर सायकलिंग आणि ५ किलोमीटर धावणे अशी घेतली जाणार आहे. तर सुपर बीइंग २०२३ ट्रायथलॉन स्पर्धेतील ऑलम्पिक डिस्टन्स या गटात १.५ किलोमीटर पोहणे, ४० किलोमीटर सायकलिंग आणि १० किलोमीटर धावणे तर स्प्रिंट डिस्टन्स गटात ७०० मीटर पोहणे, २०० किलोमीटर सायकलिंग तर ५ किलोमीटर धावणे, अशा पद्धतीने घेण्यात येणार आहे यावर्षी प्रथमच सुरू करण्यात आलेल्या हाफ इरोनमान स्पर्धेत १.९ किलोमीटर ओपन लेक स्विमिंग, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१.१ किलोमीटर धावणे अशा पद्धतीने पाच प्रकारात सदर स्पर्धा घेण्यात येणार आहे. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या स्पर्धेचे आयोजन गतवर्षीही करण्यात आले होते आणि यंदा ही स्पर्धेची दुसरी आवृत्ती आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, केरळ, गुजरात, बेळगावसह देशातील इतर भागातील स्पर्धक सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही सुपरबिंग स्पर्धा दोन टप्प्यात घेतली जाते. या दोन स्पर्धांमध्ये धावणे, सायकलिंग आणि जलतरण स्पर्धा घेतल्या जातात. बेळगावच्या किल्ला तलावाचा वापर जलतरण स्पर्धांसाठी केला जातो. तलावाच्या आजूबाजूच्या भागात धावण्यासाठी आणि सायकल चालवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा वापर केला जातो. त्यासाठी विशेष तयारीही करण्यात आली असून उमेदवारांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी बोलताना आणखी एक समन्वयक गिरीशा दंडन्नवर म्हणाल्या की, गेल्या वर्षी झालेल्या सुपरबींग ट्रायथलॉन आणि ड्युएथलॉन स्पर्धे त देशाच्या विविध भागातून १५० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी देखील २०० हून अधिक स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता आहे. यंदाच्या स्पर्धेत काही परदेशी खेळाडूही सहभागी होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी १ फेब्रुवारीपर्यंत आपली नावे नोंदवावीत, अधिक माहितीसाठी ९९८००८०४२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक गटातील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आकर्षक चषक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहेया संपूर्ण स्पर्धे त २.७२ लाखाची बक्षिसांची खैरात केली जाणार आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी १ फेब्रुवारी पर्यंत आपली नावे नोंदवावीत. आजच्या पत्रकार परिषदेला आशिकी आजरेकर, रघुराम एन व्ही, अमित वागराळे, एम बी पाटील, विजयकुमार हिरेमठ व अजाज इनामदार उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

रयत गल्ली विहिरीत ड्रेनेज मिश्रित पाणी; जनतेचे आरोग्य धोक्यात

Spread the love  बेळगाव : ड्रेनेजचे सांडपाणी जमिनीत झिरपून रयत गल्ली, वडगाव येथील विहिरी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *