बेळगाव : नामधारी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांचे नाव कार्यकर्ते विरहित नेते म्हणून राजकीय वर्तुळात चर्चिले जाते. प्रकाश शिरोळकरांच्या मनमानी कारभाराला कंटाळून बरेच कार्यकर्ते शिवसेनेपासून फारकत घेऊन वेगळे झाले आहेत व त्यांनी आपली वेगळी अशी चूल मांडली आहे. शिवसैनिक सोबत नसलेल्या शिरोळकरांनी उसणे अवसान आणण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळीना सोबत घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली.
शिरोळकरांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द पहाता जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी शिवसेनेचा परीघ वाढविण्याऐवजी शिवसेना संकुचित करण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे आज शिरोळकरांची शिवसेना ही कार्यकर्ताहीन शिवसेना अशी स्थिती झाली आहे. हातावर मोजण्याइतके कार्यकर्ते त्यांच्याकडे राहिल्यामुळे समितीच्या नेत्यांना हाताशी धरून त्यांनी काल आपल्या कार्यालयात शिवसेनाप्रमुखांची जयंती साजरी केली. तर दुसरीकडे शिवसेनेच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी टिळक चौक येथे साजरी केली.
नेहमीच मराठी भाषिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपली टिमकी वाजविण्यात शिरोळकर आघाडीवर असतात. ज्यांना स्वतःची संघटना मजबूत करता आली नाही अश्या तथाकथित नेत्याच्या कार्यपद्धतीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते विचार करतील का?
महाराष्ट्र एकीकरण समिती इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पंगतीत बसवून घेताना दुजाभाव दाखवितात. मात्र आज नामधारी जिल्हाप्रमुखांच्या पंगतीत म. ए. समिती कशी काय बसली? असा प्रश्न जाणकार व्यक्त करताना दिसत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta