चिकोडी : चिकोडी उपनिबंधक कार्यालयावर लोकायुक्तानी छापा टाकून 30 हजार लाच घेताना चिकोडी वरिष्ठ उपनिबंधक यांना ताब्यात घेतले आहे.
बेळगाव लोकायुक्त एसपी यशोदा वंटगुडी यांच्या नेतृत्वाखाली लोकायुक्त पथकाने चिकोडी उपनिबंधक कार्यालयावर अचानक छापा टाकला. यावेळी जमीन खाते बदल करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच घेत असताना चिकोडी वरिष्ठ उपनिबंधक शिवराजू हे रंगेहाथ सापडले. राजू नावाच्या व्यक्तीकडून आलेल्या तक्रारीवरून ही धाड घालण्यात आली .
तसेच वरिष्ठ उपनिबंधक शिवराजु यांच्या घरावर देखील लोकायुक्त पथकाने धाड घालून झडती घेतली.
रात्री उशिरा कार्यालय व घर या दोन्ही ठिकाणी कागदपत्रांची पाहणी व झडती घेण्यात आली.
या घटनेमुळे नेहमी गजबजणाऱ्या मिनि विधान सौध परिसरात एकच खळबळ उडाली.
Belgaum Varta Belgaum Varta