ज्योती गवी फाऊंडेशनतर्फे प्रबोधनात्मक शिबीर व तिळगूळ समारंभ संपन्न
बेळगाव : स्त्री पुरुष असा कोणताच भेदभाव न करता एकमेकांनी एकमेकांना समजून घेऊन प्रत्येक क्षेत्रात कार्य करण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे काळाची गरज निर्माण झाली आहे. मतभेद आणि भेदभाव दूर करून स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती करायला हवी. काकती येथे जन्मलेल्या कित्तुर राणी चन्नमांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड करून भारत स्वतंत्र मिळविण्यासाठी आहुती देऊन इतिहास रचला आहे. जिजामाता, झाशीची राणी, लक्ष्मीबाई टिळक, सावित्रीबाई फुले, युसुफजाई मालाला, सिंधू ताई सपकाळ, पी टी उषा, कल्पणा चावला, प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या कार्यातून आपला ठसा उमटवला आहे तो आजच्या काळात स्त्रियांनी आदर्श घेऊन पुढे यशस्वी वाटचाल सर्वांनी करायला हवी. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, महात्मा गांधी, संत तुकाराम यासह अनेक थोर महामानवाचे विचार आत्मसात करून ध्येय गाठण्यासाठी अथक प्रयत्न करावे. आजच्या काळात स्त्रियांनी आदर्श घेऊन स्वताच्या पायावर उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे; आज स्त्रियांनी अबला नाही तर सबला होण्याची आवश्यकता आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, राजकिय, शिक्षण, कला क्रीडा, सहकार, धार्मिक, मानसिक संतुलन, आरोग्यउद्योग यासह अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करावे, असे प्रतिपादन राणी पार्वातिदेव पदवी महाविद्यालय बेळगांव येथील प्रमुख वक्ते प्रा. मायाप्पा पाटील बोलत होते.
काकती तालुका बेळगाव येथील ज्योती गवी फाऊंडेशनतर्फे 23 जानेवारी रोजी श्री सिध्देश्वर देवस्थान मंदिर कार्यालय येथे सायंकाळी 7 वाजता प्रबोधनात्मक व्याख्यानाचे शिबिर आणि तिळगुळ समारंभ निमित राणी पार्वातिदेव पदवी महाविद्यालयं बेळगांव येथील प्रमुख वक्ते प्रा. मायाप्पा पाटील यांनी “महिला सक्षमीकरण आणि आजच्या काळातील स्त्री : जिजामातांचा आदर्श एक चिंतन” या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजिन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी सिधाप्पा टुमरी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते राहुल जारकेहोळी, प्रेमा येतोजी यांनी फोटो पूजन केले. दिप्रजवलन सुनिल सुनगार, यल्लाप्पा कोळेकर, उपाध्यक्षा वर्षा मुचंडीकर, मलगौडा पाटील, सागर पिंगट, पूनम कांबळे, लक्ष्मी कानशिडे यांनी केले. स्वागत सुजाता बेळगावकर यांनी केले. प्रास्ताविक फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि माजी ग्राम पंचायत अध्यक्षा व विद्यमान सदस्या समाजसेविका ज्योती गवी केले. रोपट्याला पाणी सुनिता गवानी, विद्या केसकर, सिद्दक्की अंकलगी, गीता बेळगावी, सुषमा वांजरे यांनी रोपट्याला पाणी घालून पर्यावरण संदेश दिला. परिचय अनिता धोंजी व लता मोहिते पाटील यांनी करुन दिला. सूत्रसंचलन एस. व्हि. पाटील आणि कविता सोनुलकर यांनी केले. तर जयश्री टुमरी यांनी आभार मानले. यावेळी गजानन गावांनी, महेश तंबाखूवाले, भावकांना टुमरी, अनिल पाटील, अरुण टुमरी, प्रा. निलेश शिंदे, लक्ष्मी कुरबर, दिनेश गवी, वैभव गवी, सुधिर लोहार, उदय पाटील, ए. व्हि. सुतार, नितीन पाटील, एस. एस. पाटील, विजय पाटील, अजित पाटील एन. जी. पाटील, यासह विविध संघटन व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी, महिला, विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta