Saturday , October 19 2024
Breaking News

श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळतर्फे हळदी-कुंकू समारंभ उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : शनिवार दि. 28 जानेवारी 2023 रोजी श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळतर्फे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गोकुळ प्रदेश मटृद महिला स्व-सहाय संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मान्यवर म्हणून उपस्थित होत्या. तसेच श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रमाकांत दादा कोंडुस्कर व राजहंस गल्लीचे ज्येष्ठ पंच श्री. ज्योतिबा लाटुकर, बाळू कुऱ्याळकर, रवी येळूरकर, करेगार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश पुजन व सरस्वती पुजन करण्यात आले. त्यानंतर दिपप्रज्वलन व स्वागतगिताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवर महिलांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. त्यानंतर कु. वैष्णवी मंगनाईक (येळ्ळूर) या मुलीने स्त्रिशक्ती या विषयावर सुंदर व्याख्यान सादर केले. यानंतर श्रीराम सेना राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रमाकांतदादा कोंडुस्कर यांचे स्त्रिचे महात्म्य सांगणारे महत्वपूर्ण भाषण झाले. त्यानंतर हळदी कुंकू कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यावेळी उपस्थित प्रत्येक महिलांना हळदी-कुंकू सोबत आकर्षक भेटवस्तू देण्यात आली व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात श्रीराम सेना हिंदुस्थानच्या हजारो महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला रेखा कुलकर्णी, सरिता बोबाटे, वनिता सुतार, महादेवी कुंभार, सुनिता उपाध्ये, निता चंदगडकर, रेणुका कुऱ्याळकर, रुपा येळ्ळूरकर, मंगल कामू, सिमा येळ्ळूरकर, अनिता जाधव, रेणुका बडमंजी, रेणुका लाटुकर, निता भांदुर्गे, या मान्यवर म्हणून उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात प्रिया लाटुकर, शितल लाटुकर, सुजाता लाटुकर, मंगल लाटुकर, रिया लाटुकर, सुमन सप्रे, अंजना, वैशाली जाधव, सुनिता लाटुकर, सुनंदा पाटील, लिला पाटील वैशाली इटगीकर, ब्रम्हकुमारी सुतार, उगम परमोजी, तेजश्री कुर्याळकर या महिला कार्यकत्यांनी विशेष परिश्रम घेतले.

श्रीराम सेना अनगोळ अध्यक्ष उमेश कुऱ्याळकर, बेळगाव महानगर अध्यक्ष श्रीकांत कुऱ्याळकर व श्रीराम सेना अनगोळच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष सुतार यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *