Wednesday , April 22 2026
Breaking News

अखेर ठरलं; शिवसेनेचे बळ वाढणार! दिडशेहून जास्त कार्यकर्ते बांधणार मंगळवारी ‘शिवबंधन’

Spread the love

 

मंगळवारी ‘शिवबंधन’, कार्यकर्त्यांना दिली जाणार पक्षनिष्‍ठेची प्रतिज्ञा

बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या सीमाप्रश्नाला बळ मिळावे या उद्देशाने शिवसैनिकांना शिवबंधन बांधून मशाल हाती देण्याचे काम शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल मंगळवारी शहरातील टिळक चौक येथील सभा मंडपात होणार्‍या भव्य मेळाव्यात कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेची प्रतिज्ञा दिली जाणार आहे. दुपारी 4 वाजता होणाऱ्या या मेळाव्यास शहरातील अनेक शिवसैनिक येणार असल्याचा दावा तालुका प्रमुख सचिन गोरले यांनी केला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख असलेले आपल्या पदाचे दुरूपयोग केला जात असून त्यांच्या त्या पदानुसार कोणतेच कार्य पक्षासाठी केले झात नाही. त्यामुळे सिमाभागातील शिवसेना असून नसल्यासारखी गत झालेली आहे. त्याच्या पुढे एक पाय टाकून झालेली मरगळ दूर करून अशांना शिवसेना ‘प्रतिज्ञादिना’ने उत्तर देणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र हा फक्त शिवसैनिकांचा मेळावा असल्याचे सचिन गोरले यांनी सांगितले. ‘प्रतिज्ञा दिनासाठी सर्व गटप्रमुखांपर्यंतच्या पदाधिकार्‍यांना बोलावण्यात आलेले नाही. तरी देखील अनेक शिवसेना प्रेमी ही संख्या खूप मोठी आहे. त्यांच्याशिवाय बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर तालुका शिवसैनिकही येणार असल्याचे असेही गोरले यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला तालुका प्रमुख सचिन गोरले, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे, आकाश डुकरे, उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते व कार्यकर्ते उपस्थित राहाणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात देण्यात येणार्‍या शिवबंधनाचे पावित्र्य शिवसैनिक पाळतील आणि हाती शिवसेनेची मशाल व भगवा असेल, असा विश्वास उपशहर प्रमुख राजू तुडयेकर यांनी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *