Sunday , December 14 2025
Breaking News

समितीने एकच उमेदवार द्यावा अन्यथा गावात फिरू देणार नाही..

Spread the love

 

धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय

बेळगाव : धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवार दि. 30 रोजी येथील बसवाण्णा मंदिरात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बसवंत रेमाणाचे होते.

येत्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येवून आपसातील मागील हेवेदावे बाजूला ठेवून एक दिलाने समितीच्या उमेदवाराला भरघोस मतानी विजयी करण्याचे या बैठकीत एक मताने ठरले. 8 ते 10 वर्षाच्या काळात धामणे विभागातील म. ए. समितीच्या बैठकीला धामणे, ब्रम्हलिंगहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील समिती प्रेमी मराठी भाषिकांची उपस्थिती मोठ्या संख्यने होती.

बैठकीच्या सुरुवातीला यल्लाप्पा रेमाणाचे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन बैठकी विषयी माहिती देवून आपापले विचार मांडावे असे सांगितले. त्यानंतर म. ए. समितीच्या नेत्यानी बेळगांव दक्षिण मतदारसंघात एकच उमेदवाराची निवड करावी नाहीतर म. ए. समितीच्या कोणत्याही नेत्याला मतदानाच्या प्रचाराला धामणे विभागात पाय ठेवू देणार नाही, असे परखड विचार बैठकीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे म. ए. समितीचा उमेदवार निवडणूक जाहीर होताच एक महिना अगोदर जाहीर करावा. कारण यामागे अनेक वेळा प्रत्येक निवडणूक वेळी तडकाफडकी उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय समितीच्या नेत्यानी घेतल्याने अनेक समितीचे कार्यकर्ते समितीपासून दुरावले असल्याचे मत या बैठकीत कार्यकर्त्यांनी मांडले. त्याचप्रमाणे आता राष्ट्रीय पक्षाचे झेंडे प्रत्येकांच्या घरावर त्या घरच्याना न विचारता झेंडे लावत आहेत. त्याचेसाठी समितीच्या मराठी बांधवानी आपल्या घरावर भगवा झेंडा लावावा असेही उपस्थित अनेक युवकांनी आवाहन केले.

या बैठकीला उपस्थित असलेले ग्राम पंचायत सदस्य एम. आर. पाटील, मनोहर जायाणाचे, तातोबा मरगाणाचे, प्रसाद पाटील, किरण चतुर, उमेश डुकरे, माजी ग्रा. पं. सदस्य विजय बाळेकुंद्री, नारायण पाटील अरुण अकणोजी, बाळु जायाणाचे, बाळु केरवाडकर आदीनी आपले विचार मांडले. यानंतर यल्लाप्पा रेमाणाचे यानी पुढील आठवड्या पर्यंत धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची युवा आघाडीची कार्यकारीनी निवडणे व प्रत्येक गल्लीतील कमिटी करण्यासाठी पुन्हा लवकरच धामणे विभाग म. ए. समितीची बैठक घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

बैठकीला ग्राम पंचायत सदस्य पंडीत पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य महादेव येळवी, देवस्थानी पंच श्रीकांत डुकरे, महादेव चौगुले, जोतीबा धर्मुचे, दशरथ येळ्ळूरकर, युवराज मादाकाचे, राहुल बाळेकुंद्री, सतेश जायाणाचे, आपा कोमाणाचे, त्याचप्रमाणे स्नेहल पाटील, उज्वला बाळेकुंद्री, लता बस्तवाडकर, रेश्मा येळ्ळूरकर त्याचप्रमाणे धामणे, ब्रम्हलिंगहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

Spread the love  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *