बेळगाव : राकसकोप बससेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. बरेच दिवस झाले राकसकोप बस राकसकोप गावामध्ये न जाता बेळगुंदीमधून परत बेळगावला बस चालक घेऊन जात आहे, अशी तक्रार विद्यार्थी करत आहेत. कारण बससेवा व्यवस्थित नसल्या कारणामुळे विद्यार्थी शाळा व कॉलेजला वेळेवर जाऊन पोहचत नाहीत त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे त्वरित बससेवा सुरळीत चालू करावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. या गोष्टीकडे लोकप्रतिनिधी लक्ष देऊन ही समस्या कायमस्वरूपी मिटवावी, अशी मागणी विद्यार्थी व प्रवासी करत आहेत. कारण खासगी वाहनाने प्रवास करणे खर्चिक असल्या कारणामुळे गरीब विद्यार्थी आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta