Wednesday , March 4 2026
Breaking News

नवहिंद महिला प्रबोधन संघ व प्रियदर्शनी नवहिंद महिला सोसायटी यांच्या वतीने महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ उत्साहात

Spread the love

 

 

येळ्ळूर : आपली मुले सुसंस्कृत होण्यासाठी त्यांना दररोज अभ्यासाला प्रोत्साहन केले पाहिजे. त्यांच्याकडून घरातील सर्व प्रकारची कामे करून घेतली पाहिजे. स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन मोठ्यांचा आदर करणे शिकवले पाहिजे, असे विचार हळदीकुंकू -महिला मेळाव्यात निवृत्त शिक्षिका सौ. आशा रतनजी यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबोधन संघाच्या अध्यक्षा सौ. शुभांगी प्र. पाटील या होत्या. नवहिंद महिला प्रबोधन संघ व प्रियदर्शनी नवहिंद महिला सोसायटी यांच्या वतीने नवहिंद भवन येळ्ळूर येथे महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर प्रियदर्शनी सोसायटीच्या चेअरपर्सन माधुरी पाटील, निवृत्त शिक्षिका सुनीता पाटील, सौ. वीना पाटील, सौ. प्रतिमा पवार, ओयासिस कम्प्युटरच्या संचालिका मेघा नंद्याळकर, सौ. प्रतिमा घाडी उपस्थित होत्या.
यावेळी आपल्या प्रास्ताविकामध्ये सौ. सरिता जाधव यांनी महिलांच्या सुप्तगुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नवहिंद महिला प्रबोधन संघ कार्य करतो तर महिलांना बचतीची सवय लावणे व छोट्या-मोठ्या उद्योगासाठी व आर्थिक गरजा सोडविण्यासाठी प्रियदर्शनी महिला सोसायटी आर्थिक पाठबळ देते, असे सांगितले व आजच्या वैज्ञानिक युगातील महिलांसमोरील विविध समस्या सोडविण्यासाठी योग्य व्यक्तीकडून हक्काचा न्याय मिळवता आला पाहिजे. यासाठी हा हळदीकुंकू व महिला मेळावा घेण्यात येतो, असे सांगितले. तसेच यावेळी सौ. शुभांगी पाटील, सौ. सुनीता पाटील व सौ. प्रतिभा घाडी यांनी हळदीकुंकू व मेळाव्याचे महत्त्व सांगणारे विचार मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व इशस्तवन आणि मान्यवर पाहुण्यांच्या दीप प्रज्वलनाने व सावित्रीबाई फुले प्रतिमा मालार्पणाने झाली. सूत्रसंचालन सेक्रेटरी संध्या उंदरे यांनी केले. पाहुण्यांची ओळख सौ. नयन उघाडे यांनी केले. मेळाव्याला गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. शेवटी संचालिका सौ. नम्रता पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *