
खानापूर : खानापूर येथे डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नियती फाउंडेशनच्या वतीने खानापूर येथे कित्तुर राणी चनम्मा ट्रॉफी मुलींच्या थ्रो बॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यासाठी मुलींचा व त्यांच्या पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सामन्यामध्ये 16 मुलींचे संघ सहभागी झाले होते. नियती फाउंडेशनतर्फे विजेत्या संघाला 70001 रुपये, 5000 रुपये व 3000 रुपये रोख पारितोषिके देण्यात आली. व सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. प्रथम क्रमांक गव्हर्मेंट हायस्कूल खानापूर यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक ताराराणी जीएफजीसी खानापूर व तृतीय क्रमांक खानापूर वॉरियर्स यांनी पटकावला.
यावेळी डॉ. सोनाली सरनोबत यांनी इतर मुलींसोबत थ्रो बॉल खेळण्याचा आनंद लुटला. या सामन्या दरम्यान डॉ. सोनाली सरनोबत, परमपूज्य श्री शांडिलेश्वर स्वामीजी, आनंद पाटील, बालेश चव्हाणावर, अनिता कोळमस्कर, भीमसेन अगसर, अनुसया अगसर, विकास वडार हे उपस्थित होते. यावेळी या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली नियती फाउंडेशन नेहमीच महिलांना प्रोत्साहन आणि युवा प्रेरणेचे उदाहरण देत आहे. आणि तरुणांमध्ये आत्मशक्ती आणि राष्ट्रभक्तीची आवड निर्माण व्हावी यासाठी नियती फाउंडेशन प्रयत्न करीत आहे. असेही डॉ. सोनाली सरनोबत यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta