बेळगाव (प्रतिनिधी) : दैवज्ञ ब्राम्हण समाज शिक्षण संस्था व श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोासयटी लि., यांच्या संयुक्त विद्यमाने सोसायटीच्या सभागृहात कै. जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट यांची २२० वी जयंती साजरी करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर तसेच प्रमुख पाहुणे मंदार मुतकेकर, व्हा. चेअरमन विजय सांबरेकर, दैवज्ञ ब्राम्हण समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायक कारेकर व सेक्रेटरी दीपक शिरोडकर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन नानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायक कारेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विनायक कारेकर यांनी प्रमुख पाहुणे मंदार मुतकेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
सोसायटीचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर यांनी आपल्या भाषणात नानांच्या सामाजिक व आर्थिक कार्याबद्दल माहिती दिली. पिढीजात सुवर्ण श्रीमंत घराण्यात जन्मलेल्या नानांनी समाजातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वेळोवेळी शैक्षणिक व आर्थिक मदत केली. स्त्री शिक्षणाला प्राधान्य देऊन महाविद्यालयांची स्थापना केली. मुंबईची जडणघडण करण्यात नानांचे मोठे योगदान होते असे ते म्हणाले.
यावेळी प्रमुख पाहुणे मंदार मुतकेकर म्हणाले, नानाशंकर शेट हे सर्वच समाजासाठी एक प्रेरणास्थान होते. ब्रिटीश राजवटीत सुद्धा नानांनी सर्व बांधवांना एकत्रित करुन सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व दळणवळण अशा सर्व क्षेत्रात प्रगती केली. त्यांनी नानांच्या जीवनाविशयी सविस्तर माहिती दिली. तसेच संस्थेचे व्हा. चेअरमन विजय सांबरेकर यांनीही नानांच्या जीवनशैलीचा आढावा घेतला.
यावेळी दैवस सांस्कृतिक भवनचे अध्यक्ष मारुती सांबरेकर, दैवस सुवर्णकार व्यावसायिक संघाचे अध्यक्ष प्रदीप अर्कसाली, कालिका दैवज्ञ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नितीन कलघटकर व दैवज्ञ भगिनी मंडळच्या अध्यक्षा संजना काकतीकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला सोसायटीचे संचालक प्रकाश वेर्णेकर, राजू बांदिवडेकर, माणिक सांबरेकर, अमित सांबरेकर, दत्ता महांगावकर, विशाल शिरोडकर, दैवज्ञ भगिनी मंडळाच्या भगिनी, सदस्या, संस्थेचे कर्मचारी वर्ग व हितचिंतक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा शिरोडकर तर आभार प्रदर्शन अभय हळदणकर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta