बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज रविवारी सकाळी पाटण येथे महाराष्ट्राचे सीमा समन्वय मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारीचा नियोजित ‘चलो मुंबई’ मोर्चा आणि महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादासंदर्भातील विविध ताज्या घडामोडींबद्दल चर्चा केली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेणाऱ्या शिष्टमडळात खजिनदार प्रकाश मरगाळे, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, ऍड. एम. जी. पाटील, मंगणाकर व इतर पदाधिकारी -सदस्यांचा समावेश होता.
Belgaum Varta Belgaum Varta