Saturday , March 7 2026
Breaking News

मध्यवर्तीच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवार, भुजबळ यांची भेट

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सोमवारी सकाळी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मंत्री छगन भुजबळ आणि जयंतराव पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारीचा नियोजित ‘मुंबई चलो’ मोर्चा आणि महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादासंदर्भातील विविध ताज्या घडामोडींबद्दल चर्चा केली. मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली माजी केंद्रीय मंत्री शरद पवार माजी मंत्री भुजबळ आणि जयंतराव पाटील यांची सिल्वर ओक इस्टेट मुंबई येथे भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, ऍड. एम. जी. पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी व इतर पदाधिकारी यांचा समावेश होता.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *