Monday , May 25 2026
Breaking News

जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच. व्ही. यांची बदली

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. व्ही. दर्शन यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भोयर हर्षल नारायणराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. शनिवारी राज्यातील १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

यामध्ये बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन यांचाही समावेश आहे. एच. व्ही. दर्शन यांची अद्याप बदलीची जागा निश्चित करण्यात आलेली नसून त्यांच्या जागी विजापूर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भोयर हर्षल हर्षल नारायणराव यांची नेमणूक करण्यात आली आहे.

दर्शन एच. व्ही. हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. बेळगाव जिल्हा स्वीप समिती अध्यक्षपदिहि ते कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच बेळगाव जिल्हा पंचायतीने रोजगार हमी योजनेत देशपातळीवर अधिक काम करण्यात अव्वल क्रमांक फटकाविला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हि बदली करण्यात आली असून निवडणुका संपताच दर्शन हे पुन्हा बेळगावला येण्याची दाट शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिवम असोसिएट्स पाठोपाठ अन्य चार संशयित कंपन्या पोलीस रडारवर

Spread the love  बेळगाव. – बेळगाव जिल्ह्यात ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप शिवम असोसिएट्सवर झाल्यानंतर, जिल्ह्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *