बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीची बैठक संपन्न
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने 28 फेब्रुवारीला मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलनचा नारा दिला आहे. हे धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी, बेळगाव तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना उपस्थित करण्यासाठी तालुक्यामध्ये जनजागृती करावी व हे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन ऍड. सुधीर चव्हाण यांनी केले. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीची बैठक कॉलेज रोड येथील कार्यालयात सोमवार दिनांक 13 रोजी संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा आघाडीची चिटणीस मोनाप्पा संताजी होते.
मोनाप्पा संताजी यांनी प्रास्ताविक करून म्हणाले की, मुंबई येथे होणाऱ्या धरणे आंदोलनात बेळगाव तालुक्यातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना या आंदोलनात नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी जागृती करणे गरजेचे आहे, तसेच जे कार्यकर्ते या आंदोलनात येणार आहेत त्यांची नांवे व वाहन क्रमांक कार्यालयात द्यावे. व युवा आघाडीच्या कार्यात अनेक कार्यकर्त्यांना सामावून घेऊन बळकट केली पाहिजे, असे म्हणाले. यावेळी धरणे आंदोलनात संदर्भात अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी यल्लाप्पा रेमानाचे, माजी तालुका पंचायत सदस्य कृष्णा हुंदरे, राजू किनेकर, अनिल पाटील, वासू सामजी, विनायक पाटील, सचिन दळवी, नवनाथ खामकर, नारायण सांगावकर, आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, माजी एपीएमसी अध्यक्ष आप्पा जाधव, पुंडलिक पावशे, भागोजी पाटील, कांतेश चलवेटकर, नारायण गोमानाचे, रामलिंग गुरव, अनिल हेगडे, तुकाराम मन्नोळकर, महादेव हुंदरे, नागेश किल्लेकर, सोमनाथ पाटील, शुभम देसुरकर, प्रवीण देसुरकर, अंकुश पाटील, किसन लाळगे, अनिल ओऊळकर, नारायण मोरे, किरण मोटनकर, कार्यकर्ते उपस्थित होते. मोनाप्पा संताजी आणि शेवटी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta