सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; सभासदांना 12 टक्के लाभांश
येळ्ळूर : नवहिंद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला आर्थिक वर्षात 91 लाख 68 हजार रुपयांचा नफा झाला आहे. सभासदांना 12 टक्के लाभांश देण्यात येईल, अशी माहिती चेअरमन उदय जाधव यांनी 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलताना दिली.
जाधव पुढे म्हणाले, संस्थेकडे 266 कोटी रुपयांचे खेळते भांडवल, 42 कोटी रुपये गुंतवणूक, 247 कोटी रुपये ठेवी जमा आहेत तसेच 203 कोटी रुपये कर्ज दिली आहेत, असे सांगितले.
व्यासपीठावर चेअरमन उदय जाधव, व्हा. चेअरमन संभाजी कणबरकर, नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, संचालक पी. एस. मुरकुटे, सी. बी. पाटील, प्रकाश अष्टेकर, एस. वाय. चौगुले, नीता जाधव. बी. आर. पुण्यान्नावर, प्रियदर्शनी नवहिंद महिला सोसायटीच्या चेअरपर्सन सौ. वैशाली मजुकर, नवहिंद महिला प्रबोधन केंद्राच्या अध्यक्षा सौ. शुभांगी पाटील, नवहिंद मल्टीपर्पज चेअरमन डी. एन. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी वार्षिक सभेत सदाशिवनगर शाखेचे व्यवस्थापक जे. बी. शहापूरकर यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. ढोलगरवाडी शाखेचे व्यवस्थापक विनोद पाटील यांनी ताळेबंद पत्रक सादर केले. उद्यमबाग शाखेचे व्यवस्थापक एस. के. बामणे यांनी नफा-तोटा पत्रकाला मंजुरी घेतली. मुतगा शाखेचे व्यवस्थापक निलेश नाईक यांनी नफा विभागणी, वडगाव शाखेचे व्यवस्थापक दिनेश पाटील यांनी 2021-22 सालाचे अंदाजपत्रकाचे वाचन केले व मंजुरी घेतली.
नवहिंद मल्टीपर्पज सोसायटीचे संचालक श्री. आनंद पाटील यांनी कोरोन काळातही संस्थेने गतीमान प्रगती साधली असल्याचे गौरवोद्गार काढले. संस्थेचे संचालक अनिल हुंदरे यांनी सूत्रसंचालन केले.
सभेस माननीय सभासद, संस्थेचे असिस्टंट जनरल मॅनेजर एन. डी. वेर्णेकर, वसुली अधिकारी जे. एस. नांदुरकर, हेड ऑफिस इनचार्ज विवेक मोहिते, सर्व शाखा अधिकारी व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
शेवटी संचालक प्रकाश अष्टेकर यांनी आभार मानले.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …