आज रोवण्यात आली शामियान्याची मुहूर्तमेढ
बेळगाव : श्री हरी विठ्ठल रुक्मिणी अभिवृद्धी वारकरी सेवा संघ बेळगाव यांच्यावतीने दिनांक 7 नोव्हेंबर रोजी आदर्श नगर, वडगाव येथील आदर्श विद्यामंदिर मैदानावर पारायण आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पारायण आणि कीर्तन सोहळा स्वामी यांची मुहूर्तमेढ नुकतीच घेण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप ओबीसी युवा मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव, नगरसेवक मंगेश पवार, नगरसेविका सारिका पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश घाटगे, दत्ता पवार यासह संत महाराज आणि वारकरी समाज सदस्य उपस्थित होते.
6 नोव्हेंबर पासून पारायण आणि किर्तन सोहळा सुरू होणार आहे. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन होणार आहे. दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता हभप शितलताई सांबळे यांचे कीर्तन होणार आहे. दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता कीर्तनकार हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे कीर्तन तर 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता कीर्तनकार हभप पठाडे माऊली महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी कीर्तनाची सांगता केली जाणार असून सांगता सोहळ्या दिनी क्रांतिकारी आणि प्रख्यात कीर्तनकार हभप श्री इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
