Saturday , March 7 2026
Breaking News

शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेत टिळकवाडी विभाग अ संघाला विजेतेपद

Spread the love

 

बेळगाव : टिळकवाडी येथील व्हॅस्कीन डेपो मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना व क्रीडाभारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने बेळगाव शहर माध्यमिक आंतर विभाग शिक्षकांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढतीत टिळकवाडी अ संघाने गोमटेश टिळकवाडी ब संघाचा अटीतटीच्या लढतीत अवघ्या 3 धावांनी पराभव करीत हनुमान चषक पटकाविला. अंतिम सामन्यातील सामनावीर देवेंद्र कुडची, मालीकावीर उमेश बेळगुंदकर, उकुष्ट गोलंदाज श्रीहरी लाड, उकूष्ट फलंदाज रवि पुनसगौडा सर्वोत्तम शिस्तबद्ध संघ कॅम्प विभाग यांना देण्यात आला. पहिल्या सामन्यात टिळकवाडी अ संघाने शहापूर विभागचा 47 धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात गोमटेश टिळकवाडी ब संघाने उत्तर विभागाचा 9 गड्यानी पराभव केला.
तिसऱ्या सामन्यात टिळकवाडी अ संघाने कॅम्प विभागाचा 33 धावांनी पराभव केला.
अंतिम लढतील प्रथम फलंदाजी करताना टिळकवाडी अ संघाने 8 षटकात सर्वबाद 53 धावा केल्या. प्रत्युउत्तरादाखल खेळताना गोमटेश टिळकवाडी ब संघाने 8 षटकात 4 बाद 50 धावा केल्या व सामना अवघ्या 3 धावांनी गमविला. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडाभारती उत्तर कर्नाटकचे सहसचिव विश्वास पवार, बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुंडी, बालिका आदर्श शाळेचे मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी, गोमटेश शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील, अशोक अन्नीगेरी, अस्मिता इंटरप्राईजेसचे संचालक राजेश लोहार, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील, सचिव एच. बी. पाटील माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव उमेश कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, जयसिंग धनाजी या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी नागराज भगवंतण्णावर, नितीन नाईक, प्रमोद जपे, प्रभाकर कंग्राळकर, रामलिंग परीट, उमेश बेळगुंदकर, देवकुमार मंगणाकर, अश्विन पाटील, निखिल कदम, देवेंद्र कुडची, व विविध विभागातील शिक्षक व क्रीडाशिक्षक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *