Monday , April 20 2026
Breaking News

बेळगाव शहराच्या विविध ठिकाणी दि. 17 व 18 रोजी पाणी पुरवठ्यात व्यत्यय

Spread the love

 

बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या हिडकल जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. गळतीच्या दुरुस्तीचे काम बुधवार दि. 16 पासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवार दि. 17 व 18 रोजी शहरांच्या विविध भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
दक्षिण विभागातील मजगाव, नानावाडी, चिंदबरनगर, शहापूर, वडगाव आणि जुनेबेळगाव तर उत्तर विभागातील सह्याद्रीनगर, कुवेंपूनगर, टीव्ही सेंटर, सदाशिवनगर, बसव कॉलनी, कलमेश्वरनगर, सुभाषनगर, अशोकनगर, माळमारुती वसाहत, न्यू गांधीनगर, कणबर्गी, कुडची आदी भागातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे कॅटोन्मेट, हिंडाल्को कारखाना, केआयडीबी औद्योगिक वसाहत, डिफेन्स एरिया, सैनिकनगर, केएलई रुग्णालय, जिल्हा रुग्णालय त्याचप्रमाणे जलवाहिनी घालण्यात आलेल्या परिसरातील गावांचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना सहकार्य करावे, असे आवाहन एलअँडटी कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘प्यास’तर्फे सुळगा येथे तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ

Spread the love  बेळगाव : प्यास फाउंडेशन या संस्थेने बेळगाव तालुक्यातील सुळगा गावामध्ये या वर्षातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *