
बेळगाव : येळ्ळूर लक्ष्मी गल्ली येथील दत्त मंदिरामध्ये काँग्रेसची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परशुराम ढगे हे होते. ब्लॉक अध्यक्ष किरण पाटील यांनी प्रास्ताविक केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिनातूनच काँग्रेस पक्षाने देखील मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
या बैठकीत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आदींच्या यांच्या मार्गदर्शनानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत बेळगाव दक्षिण मतदारसंघात संघटना मजबूत करण्यासाठी उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta